महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

पुणे - २२ जून २०२२ - पीडीएफए महिला लीगच्या सुपर सिक्स गटात पुणेरी वॉरियर्सने विजती सलामी दिली. त्यांनी सिटी गर्ल्स गो स्पोर्टसचा २-० असा पराभव केला.

एसएसपीएमएस मैदानावर महिला लीगमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात केवळ हाच एकमेव सामना निकाली ठरला. बाकी सर्व सामने अनिर्णित राहिले.

पुणेरी वॉरियर्सकडून दोन्ही सत्रात एकेक गोल करण्यात आला. प्रथम १०व्या मिनिटाला ऐश्वर्या जगताप हिने गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात सामन्याच्या ५७व्या मिनिटाला किर्ती गोडवीने दुसरा गोल केला.

अन्य सामन्यात स्निग्मय एफसीला डेक्कन इलेव्हनने १-१ असे बरोबरीत रोखले. दोन्ही गोल उत्तरार्धात नोंदवले गेल. सामन्याच्या ५७व्या मिनिटाला  निधी वर्मा हिने पहिला गोल केला. त्यानंतर तीनच मिनिटांनी कल्याणी देसळे हिने गोल करून संघाचा विजय निश्चित केला.

अस्पायर एफसी आणि उत्कर्ष क्रीडा मंच अ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

निकाल -
एसएसपीएमएस मैदान (महिला लिग)

डेक्कन इलेव्हन १ (कल्याणी देसळे ६०वे मिनिट) बरोबरी वि. स्निग्मय एफसी १ (निधी वर्मा ५७वे मिनिट)

पुणेरी वॉरियर्स २ (ऐश्वर्या जगताप १०वे मिनिट, किर्ती गोडावी ५७वे मिनिट) वि.वि. सिटी गर्ल्स गो स्पोर्टस ०

अस्पायर एफसी ० बरोबरी वि. उत्कर्ष क्रीडा मंच अ ०