सोळा वर्षांखालील गटात लौकिक एफए विजेते

पुणे २१ जून २०२२ - पीडीएफएच्या नव्या मोसमातील १६ वर्षांखालील गटात लौकिक एफए संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात त्यांनी टायब्रेकरमध्ये स्टेप ओव्हर एफए संघाचा ३-२ असा पराभव केला.
बावधन येथील गंगा लिजेंडस मैदानावर झालेल्या सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळाली. नियोजित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यानंतर टायब्रेकरमध्ये लौकिकने बाजी मारली.
टायब्रेकरमध्ये लौकिककडून सोहम सागर, आरुष वानखेडे, आदित्य साळुंखे यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. स्टेपओव्हरच्या रोहन कट्या आणि इव्हान डी रोझारियो यांनाच यश आले. लौकिकच्या अस्मय गायकवाड, तर स्टेपओव्हरकडून आर्य चौगुले, जसवीर धिल्लॉं, रोहन उतेकर यांना आपल्या पेनल्टी साधता आल्या नाहीत.
त्यापूर्वी, उपांत्य फेरीत लौकिक एफए संघाने मॅथ्यू एफए संघाचा १-० असा पराभव केला होता. स्टेपओव्हर एफए संघाने क्रीडा प्रबोधिनीचे आव्हान नियोजित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ५-४ असे संपुष्टात आणले.
निकाल -
गंगालिजेंडस मैदान, बावधन (१६ वर्षांखालील)
अंतिम सामना -
लौकिक एफए ०(३) (सोहम सागर, आरुष वानखेडे, आदित्य साळुंखे) वि.वि. स्टेप ओव्हर एफए ०(२) (रोहन कट्याळ, इव्हान डी रोझारियो)
तिसरा क्रमांक - क्रीडा प्रबोधिनी ३ (सई पाटिल २९आणि ४०वे मिनिट, ओम हिवळे ३८वे मिनिट) वि. वि. मॅथ्यू एफए ०
उपांत्य फेरी- लौकिक एफए १ (अस्मय गायकवाड ६०वे मिनिट)वि.वि. मॅथ्यू एफए ०
स्टेप ओव्हर एफए २ (५) (रोहन उत्तेकर १२वे मिनिट, निधीश भोसले ६२वे मिनिट, रोहन कट्याळ, इव्हान डी रोझारियो, आर्य चौगुले, जसवीर धिल्लॉं, रोहन उत्तेकर) वि.वि. क्रीडा प्रबोधिनी २ (४) (युग अगरवाल ६वे मिनिट, सई पाटिल ६०वे मिनिट, युघ अगरवाल, नीव जैन, जय कटारिया, सई पाटिल)