सहज विजयासह सिटी एफसी पुणे सुपर ८ मध्ये

नॉईजी बॉईज, गॅलाक्टिक वॉरियर्स, लौकिक एफए आणि सिटी एफसी संघांनी चमकदार कामगिरी करताना पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये तृतीय श्रेणीतून सुपर ८ मध्ये प्रवेश केला

सहज विजयासह सिटी एफसी पुणे सुपर ८ मध्ये

पुणे ७ जून २०२२ - नॉईजी बॉईज, गॅलाक्टिक वॉरियर्स, लौकिक एफए आणि सिटी एफसी संघांनी चमकदार कामगिरी करताना पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये तृतीय श्रेणीतून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. 

स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सप महाविद्यालयाच्या मैदानावरील तीन सामन्यात निसटता विजय पहायला मिळाला. नॉईजी बॉईज संघाने ओम पाटणकरच्या १८व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर नव महाराष्ट्राची आगेकूच १-० अशी रोखली. त्यानंतर गॅलाक्टिक वॉरियर्स संघाने पार्थ जोगळेकरने ५६व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर सासवड एफसीचे आव्हान १-० असे संपुष्टात आणले. 

लौकिक एफए संघाने अशाच संघर्षपूर्ण लढतीत दुर्गा एसए संघाचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला संकेत पवारने लौकिक एफए संघाला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी अभिशाह पाल याने केलेल्या गोलने दुर्गा संघाने आघाडी घेतली होती. सामन्याच्या ५५व्या मिनिटाला अभिनंद याने लौकिकचा विजयी गोल केला. 

चौथ्या सामन्यात सिटी एफसी संघाने पिछाडीवरून बेटा एससी संघाचा ३-१ असा पराभव केला. आतिश कलाटे याने सामन्याच्या १८व्या मिनिटाला बेटा संघाचे खाते उघडले होते. पण, त्यानंतर त्यांना यश आले नाही. प्रथम ३८व्या मिनिटाला अथर्व रेवालकरने बरोबरी साधली. नंतर ४७व्या मिनिटाला टिमोथीने आघाडी मिळवली आणि अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या मिनिटाला सालम सिंगने विजयी गोल केला. 

एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात डेक्कन इलेव्हन संघान युनायटेड पूना असोशिएशनचा १-० असा पराभव केला. एकमात्र गोल अंकिता काळे हिने केला. 

निकाल -

सप महाविद्यालय मैदान 
नॉईजी बॉईज १ (ओम पाटणकर १८वे मिनिट) वि.वलि. नव महाराष्ट्र ०
गॅलाक्टिक वॉरियर्स १ (पार्थ जोगळेकर ५६वे मिनिट) वि.वि. सासवड एफसी ०
लौकिक एफए २ (संकेत पवार ३९वे, अभिनंद पी ५५वे मिनिट) वि.वि. दुर्गा एसए १ (अभिशाह पाल ४१वे मिनिट)
सिटी एफसी पुणे ३ (अथर्व रेवाळकर ३८वे, टिमोथी के ४७वे, सालम सिंग ६०+३वे मिनिट) वि.वि. बेटा एससी १ (आतिष काळे १८वे मिनिट)

एसएसपीएमएस मैदान - महिला लीग
गट ब - डेक्कन इलेव्हन १ (अंकिता काळे २९वे मिनिट) वि.वि. पूना स्पोर्ट असोशिएशन ०


द्वितीय श्रेणी सुपर ८
जाएंटस अ ३ (अभिजित म्हसवडे २१वे, अंश मुळ्ये २७वने, अंन्शुल शर्मा ५७वे मिनिट) वि.वि. डेक्कन इलेव्हन सी १ (तेजस मोगल ३०+१वे मिनिट)
उत्कर्ष क्रीडा मंच ब १ (ऋत्विज वेलागा ५०वे मिनिट) वि.वि. न्यू इंडिया सॉकर ०