बॅडमिंटन: प्रिन्स, अनुपमा यांना अग्रमानांकन

नेपाळच्या प्रिन्स दहाल आणि भारताच्या अनुपमा उपाध्याय यांना कुमार गटात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्रि बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे

बॅडमिंटन: प्रिन्स, अनुपमा यांना अग्रमानांकन

कुमार गट आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा 

पुणे : नेपाळच्या प्रिन्स दहाल आणि भारताच्या अनुपमा उपाध्याय यांना कुमार गटात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्रि बॅडमिंटन स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे. 

या स्पर्धेला आज पात्रता फेरीने सुरवात झाली. मुख्य फेरीला गुरुवारपासून सुरुवात होईल. चार सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित ही स्पर्धा शिवाजीनगर येथील मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत एकूण ६४ खेळाडू मुख्य फेरीत खेळतील. यात प्रिन्सला अग्रमानांकन असून, राव गंधमला दुसरे मानांकन आहे. मुलींच्या एकेरीत अनुपमाला अग्रमानांकन असून, सामयारा पन्वरला दुसरे मानांकन आहे. या स्पर्धेत एकूण ४८२ खेळाडू सहभागी झाले आहेत. 

दोन वर्षांनंतर भारतातील ही एकमेव ग्रॅंड प्रीक्स आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ही स्पर्धा झाली होती. 

लक्ष्मी क्रीडा मंदीर अजिंक्यपद स्पर्धेने या स्पर्धेला सुरवात झाली. तेव्हा वयोगटातील ही एकमेव स्पर्धा होती. जिल्हा स्तरावर सुरू झालेली ही स्पर्धा आता भारत आणि आशियातील एक प्रमुख स्पर्धा ठरली आहे. कुमारल गटात होणाऱ्या चारपैकी आशियात ज्या दोन स्पर्धा होतात, त्यातील ही एक आहे. २०१९ पासून ही स्पर्धा सुशांत चिपलकट्टी स्मृती म्हणून खेळविण्यात येते. एकूण १५ दजार अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेची ही स्पर्धा आहे. 

या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या मानांकन यादीत पाचपैकी तीन गटात भारतीय खेळाडूंना मानांकन मिळाली आहेत.

मानांकन यादी -

पुरुष एकेरी:  १ प्रिन्स दहल (नेपाळ); २ प्रणव राव गंधम (भारत); ३ अयान रशीद; ४ लक्ष्य शर्मा); ५ पॅचरकिट एपिराचटासेट (थायलंड); ६ वेंकट उनीथ कृष्ण भीमवरपू (भारत); ७ मुहम्मद हलीम अस सिदिक (इंडोनेशिया); 8-८आयुष शेट्टी (भारत)

पुरुष दुहेरी: १ अपिलुक गतेराहोंग/विचया जिंतामुथा (थायलंड); २ जुआन जेरेमी झेन लियांग/ एम फाझरिक मोहम्मद रझीफ (मलेशिया); ३ एनगे जू जी/ जोहान प्रजोगो (सिंगापूर); ४ चोई जियान शेंग/ ब्रायन जेरेमी गुंटिंग (मलेशिया)

महिला एकेरी: १ अनुपमा उपाध्याय (भारत); २ समयारा पनवार (भारत); ३ उन्नती हुड्डा (भारत); ४ इशारानी बरुआ (भारत); ५ सीती नुरशुहैनी (मलेशिया); ६ तारा शाह (भारत); ७ रसिला महर्जन (नेपाळ)

महिला दुहेरी: १ पलक अरोरा (भारत)/ उन्नती हुड्डा (भारत); २ वैष्णवी खडकेकर (भारत)/ श्री साई श्राव्य लक्कमराजू (भारत); ३ रसिला महर्जन (नेपाळ)/ रॉन पांडे (नेपाळ); ४ महेक नायक (भारत)/ अनामिका सिंग (भारत)

मिश्र दुहेरी: १ अयान रशीद (भारत)/ महेक नायक (भारत); २ प्रिन्स दहल (नेपाळ)/ रसिला महर्जन (नेपाळ); ३-पृथ्वी कोका (भारत)/ मुस्कान खान (भारत); ४- मोहंमद नजमुल इस्लाम जॉय (बांगलादेश)/ श्रीमती नसिमा खातून (बांगलादेश)