बॅडमिंटन: चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत

अंकित मलिक,रौनक चौहान आणि अभिनव मंगलम यांनी चमकदार कामगिरीसह कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. पात्रता फेरीतून अखेरच्या दिवशी एकेरीतील 32, दुहेरीतील 24 जागा निश्चित झाल्या

बॅडमिंटन: चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत

पुणे - अंकित मलिक,रौनक चौहान आणि अभिनव मंगलम यांनी चमकदार कामगिरीसह कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. पात्रता फेरीतून अखेरच्या दिवशी एकेरीतील 32, दुहेरीतील 24 जागा निश्चित झाल्या.

हरियाणाच्या अंकितने तीन गेमच्या लढतीनंतर इशांत शेरावतचे आव्हान 18-21, 21-16, 21-16 असे परतवून लावले. अंकितने 54 मिनिटांच्या लढतीत विजय मिळविला. दिवसातील ही सर्वात लांबलेली लढत ठरली. रौनकलाही विजयासाठी 44 मिनिटे झगडावे लागले. रौनकने आदित्य दिवाकरचे आव्हान 15-21, 21-12, 22-20 असे परतवून लावले.
अन्य लढतीत दिल्लीच्या अभिनव मंगलमने ए.आर. रोहन कुमारची आगेकूच 22-24, 21-15, 21-4 अशी रोखली. ही लढत 49 मिनिटे चालली. पात्रता फेरीतून पुण्याच्या केवळ साद धर्माधिकारीला मुख्य फेरीत प्रवेश करता आला.
सादने वैष्णवी साशा हिचा 21-11, 21-11 आणि पाठोपाठ अलिशा खानचा 9-21, 21-11, 21-9 असा पराभव केला. पुण्याच्या बाकी खेळाडूंना मात्र आपले आव्हान पात्रता फेरीतच गमवावे लागले.

अंतिम निकाल (पात्रता फेरी)
पुरुष एकेरी: अभिनव मंगलम वि.वि. एआर रोहन कुमार आनंददास राज कुमार 22-24, 21-15, 21-14; सिंग जसकरण वि.वि. मार्विन अरोकिया वॉल्टर 21-5, 21-10; रुशेंद्र तिरुपती वि.वि.अश्विन कार्तिक मुथुचामी 21-13, 21-12; वेंकट साई हिमादीप अमांची वि.वि. सताक्ष सिंग 21-16, 15-21, 21-14; ध्रुव नेगी वि.वि.नुमैर शेख 21-17, 14-21, 21-19; प्रणव समाला बीटी देवांग तोमर 21-17, 21-16; प्रणय शेट्टीगर वि.वि. श्रेयस साने 21-12, 21-18; निखिल चेत्री वि.वि. सुगी साई बाला सिंगा गोपीनाथ सिंग 21-15, 21-7; अंकित मलिक वि.वि. इशांत सेहरावत 18-21, 21-16, 21-16; अनिशराज राजकुमार वि.वि. अक्षत रेड्डी गाव्वा २१-१४, २२-२०; भारद्वाज बालसुब्रमण्यम वि.वि.आदिथ केपी 21-10, 21-18; हिमानीष दास वि.वि. आर्यन श्रीवाल 21-14, 21-15; विघ्नेश थाथिनेनी वि.वि. आर्यन तुशीर २१-१५, २१-१४; हर्षित तोमर वि.वि.अभिषेक कुरुडीमत्त कोट्रेश २१-१९, २१-१६; नीर नेहवाल वि.वि. रावत सिद्धार्थ 21-13, 21-15; रौनक चौहान वि.वि. आदित्य दिवाकर १५-२१, २१-१२, २२-२०

पुरुष दुहेरी: पी. लाओथर्डपॉन्ग/जे. पाओतोंग (थायलंड) वि.वि.  मधुर धिंग्रा/ अभिनव मंगलम 27-25, 18-21, 22-20; वाय. गिरीधर/एस. हेमानडेश्वर वि.वि. उज्ज्वल चौधरी/दक्ष गौतम 21-11, 13-21, 21-19; भरतसंजाई एस/नाथन शिह वि.वि. आर्यन तुशीर/दीपांशु वत्स 21-14, 21-15; लोकेश परसा/रुशेंद्र तिरुपती वि.वि. अकुल मलिक/वैभव मेहरा 21-14, 21-15; क्रिश देसाई/प्रणय शेट्टीगर वि.वि. हर्षित दहिया/इशांत सेहरावत 21-9, 21-16; अस्मित अग्रवाल/राहुल आझाद तल्लुरी वि.वि. निखिल चेत्री/तरुण बसवराज मोराब 21-15, 21-17; भार्गव राम अरिगेला/विश्व तेज गोब्बुरु वि.वि. ध्रुव नेगी/मनीष फोगट 21-9, 21-14; सैकत बॅनर्जी/ अंकित मोंडल वि.वि.नागी रेड्डी नल्लामिल्ली/ साई कार्तिक सुसरला 21-9, 21-23, 21-18

महिला एकेरी: प्रियांका पंत वि.वि. रिद्धी भारद्वाज 21-17, 21-8; दुर्गा ईशा कांद्रपू वि.वि. श्रव्या दंडे २१-१७, २१-११; फरझा नाझरीन वि.वि. संजना गानुगु 21-18, 21-17; साद धर्माधिकारी वि.वि. अलिशा खान 9-21, 21,-11, 21-9; स्वाती श्रीकांतन वि.वि. दिशा संतोष 21-11, 21-14; सुतनवी सरकार वि.वि. धरुनिगा शंकर २१-१५, २१-१८; स्तुती अग्रवाल वि.वि अनिका सिन्हा 21-19, 22-20; आयशा गांधी वि.वि शगुनप्रीत कारु 21-7, 21-18; शीना नरवाल वि.वि प्रशांत बोनम [पीएमडी] 21-5, 21-9; चितवन खत्री वि.वि राशी मॉल 21-15, 21-15; निकिता जोसेफ वि.वि श्रेया तिवारी 23-21, 18-21, 21-13; रुजुला रामू वि.वि सिंग सिया २१-१२, २१-९; तन्वी शर्मा वि.वि दीपशिका नेरेडिमेल्ली 21-19, 17-21, 21-10; आलिशा नाईक वि.वि हेतल विश्वकर्मा 21-13; 21-13; ग्लोरिया व्ही आठवले वि.वि नयना चौहान 21-10; 21-9 21; मनसा रावत वि.वि सिमरन धिंग्रा 21-7, 21-15;

महिला दुहेरी:  साक्षी फोगट-मानसा रावत वि.वि.शीना नरवाल/ चंचल यादव 21-11 21-7; निधी देसाई/ साक्षी कुर्बखेलगी वि.वि.  पोद्दार इशिका/ राशी मॉल २१-१९, १२-२१, २२-२०; अलिशा खान/मुस्कान खान वि.वि.  पूजिथा गौडिचेर्ला/नागा साहित्य मंडलिका २१-१३, २१-१८;  श्रेया रमेश चितूर/आकांशा माटे वि.वि.  सृष्टी गुप्ता/आयक्याडा गुरव २१-१७, २१-१७; आरती चौगले/साद धर्माधिकारी वि.वि.   प्रज्ञा कटारा/वृंदा शिंदा 21-16, 16-21, 21-11;

मिश्र दुहेरी: अर्श मोहम्मद/ गार्गी गार्गी वि.वि. विश्व तेज गोब्बुरु/ विशाखा टोप्पो 21-19, 21-18; सैकत बॅनर्जी/सुतनवी सरकार वि.वि.  व्ही. चेब्रोलू/एस. अनुमुला 21-11, 21-9; शिवम मेहता/मानसा रावत वि.वि.  अंकित मलिक/पलक अरोरा 21-12, 21-13; शौर्य पंत/प्रियांका पंत वि.वि.  लक्ष्य मलिक/चितवन खत्री 21-15, 21-15; प्रेम कुमार प्रभू राज मोहन/कनिष्क गणेशन वि.वि.  अमन सुरेश/नंदा घोष 21-14, 21-16; सात्विक रेड्डी कानापुरम/ वैष्णवी खडकेकर वि.वि. भार्गव राम अरिगेला/ परिदा प्रगती 21-18, 21-15